मुंबई APMC शौचालय घोटाळ्यात 3 अधिकारी निलंबित; सचिवांची कारवाई
 
 
 
Mumbai Toilet Scam : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ,मुंबई APMCतील सुमारे ८ कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा कडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे ,अधिक तपास करण्यासाठी पोलिसांकडून बाजार समिती प्रशासनाकडे विविध प्रकारची माहिती मागवण्यात आली असून गुन्हा दाखल झालेल्या   ८ आरोपी पैकी सध्या कार्यरत असलेले   बाजार समितीचे ३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आली आहे. सुदर्शन भोजनकर (उप अभियंता) विजय शिंगाडे (उप सचिव), विलास पवार (कार्यालय अधिक्ष्यक) यांना आज निलंबन काण्यात आली आहे . बाजार समितीचे सचिव पी एल खंडागळे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे . बाजार समितीच्या इतिहासात हा सर्वात मोठी कारवाई आहे .   विजय शिंगाडे,विलास पवार,सुदर्शन भोजनकर या तिघांनी कंत्राटदार याना निविदा प्रक्रिया सह विविध प्रकारचे सहकार्य केल्याने शासनाची आर्थिक नुकसान झाली आहे , यावर नवी मुंबई आर्थिक गुन्हा शाखाने गुन्हा दाखल   केला आहे . त्यामुळे आज तिघांवर कारवाई करण्यात आली आहे .
मुंबई APMCतिल आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजार समितीतील शौचालय कंत्राटात मोठ्या प्रमाणात घोटाळा   झाला असल्याचे   फेर चौकशीत निष्पन्न झाले असून तब्बल आठ   कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह निवृत्त अधिकारी आणि सध्या कार्यरत अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाच्या निर्देशानंतर ही तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या तपासाला आता गती आली असून या घोटाळ्यात   दोन आरोपींवर गुन्हा दाखल   करण्यात आल्या नंतर त्यांना अटक करण्यात आली. सुरेश मारू व मनीष पाटील अशी यांची नावे आहेत . बुधवार २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे.