मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधे 300 टन बटाटा सडला;बाजार समितीकडून दुर्लक्ष
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधे 300 टन बटाटा सडला बाजार समितीकडून दुर्लक्ष
सडलेले बटाटा मार्केटमध्ये उघडपणे फेकले
हा बटाटा घेण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांची गर्दी
Apmc प्रशासनाकडून वेळोवेळी सडलेला बटाटा न उचलल्याने सदर घटना घडत आहे
Apmc प्रशासनाकडून जाणून बुजून नागरिकांच्या जीवाशी खेळ
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठवलेला बटाटा सडू लागला आहे. 7 दिवसांमध्ये जवळपास 300 टन माल खराब झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. याचाच फटका बटाट्याला बसला आहे. मात्र दुसरीकडे हेच सडलेले बटाटे मार्केट परिसरात टाकण्यात येत आहेत. सडलेले बटाटे हातगाड्यामधे टाकून विक्रीसाठी नेले जात आहेत.बाजारसमिती प्रशासनाने वेळेवर परिसरात पडून राहलेले सडलेले बटाटे न उचलल्याने मानखुर्द ,गोवंडी व नवी मुंबई परिसरात किरकोळ विक्री करणारे व्यापारी हे बटाटे घेवून जात आहेत. त्यामुळे मुंबई Apmc   प्रशासन जाणून बुजून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, 7 दिवसांपासून जवळपास ६ हजार गोण्यांमध्ये असलेला २५० ते ३०० टन बटाटा   खराब झाला. बदललेल्या वातावरणामुळे बटाटा सडल्याचा दावा व्यापा-यांनी केला आहे. दरम्यान सडलेल्या मालामुळे मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली असून, येथे काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरातमधून माल विक्रीसाठी याठिकाणी येत आहे. भर पावसात धक्यावर शेतमाल भिजत आहे. गोणीमध्येच माल सडू लागला आहे. लिलावगृहामध्ये सडलेले बटाटे ठेवण्यात आले आहेत. गोणीमधून पाणी बाहेर येवू लागले असून मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. मार्केटमध्ये अनेक ठिकाणी बटाट्याच्या गोण्या उभ्या केल्या आहेत. सडलेला माल उघडपणे मार्केट परिसरात   फेकण्यात येत आहे. फेकलेला माल हातगाड्यामधून भरुन   मुंबई ,नवी मुंबईला जात आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की या सडलेल्या बटाट्यामधून बटाटा वडा बनवण्यात येत असल्याची माहिती एका किरकोळ व्यापाऱ्याने दिली आहे.