श्री कुलस्वामी पतसंस्थेच्या संचालक मंडळासह,सहकार मंत्र्यावर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
 
 
सहकार मंत्री अतुल सावेसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
श्री कुलस्वामी पतसंस्था मध्ये कोट्यवधी रुपयांची घोटाळ्यावर उच्च   न्यायालयात जनहित याचिका, सरळ सहकार मंत्र्यावर कारवाईची मागणी
नवी मुंबई : श्री कुलस्वामी पतसंस्था मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांची घोटाळ्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले सहकारमंत्री अतुल सावे ,श्री कुलस्वामी पतसंस्था ,शंकर पिंगळे ,संतोष चव्हाण ,चंद्रकांत चव्हाण , तपासणी अधिकारी प्रताप पाटील,विशेष लेखा अधिकारी भगवान बोत्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच झालेल्या घोटाळ्यावर दोषी व्यक्तीवर कारवाई करून त्याच्या कडून रकम   वसूल करण्याची मागणी केली आहे. राज्याचे सहकार मंत्री व संचालक मंडळ जबाबदार असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ॲड. सचिन ढाके पालकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली असून त्याची सूनावणी 8 जून रोजी ठेवण्यात आली आहे.
कुलस्वामी पतसंस्था मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांची घोटाळावर सहकार आयुक्त मार्फत चौकशी काण्यात आली होती आणि त्याआधारे तपासणी अधिकारी यांनी ३८ शाखे मध्ये जाउन चौकशी केल्यावर बऱ्याच शाखेवर नियमवाह्य पद्धतीने पैसे खर्च करण्यात आली होती, त्याआधारे ७९ (२) नुसार कलाम ८१(३)क ) घोटाळ्याची चौकशी असताना शिंदे फडणवीस सरकारचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या आदेशाची रद्द केली . झालेल्या घॊटाळावर चौकशी असताना सहकार मंत्री यांनी रद्द केल्याने मागील ५ वर्षांपासून पतसंस्था वाचविण्यासाठी स्थापन केलेले बचाव समिती यांनी उच्च न्यायालयात   धाव   घेतली, आखिर मुंबई उच्च न्यायालयात सहकारमंत्री ,श्री कुलस्वामी पतसंस्था ,शंकर पिंगळे ,संतोष चव्हाण ,चंद्रकांत चव्हाण , तपासणी अधिकारी प्रताप पाटील,विशेष लेखा अधिकारी भगवान बोत्रे वर याचिका दाखल करण्यात आली आहे ..पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार   अशी माहिती कुलस्वामी पतसंस्थांचे सभासद आणि बचाव समितीचे पदाधिकारी अरुणा चव्हाण यांनी दिली आहे .आम्हाला न्याय पालिकेला विस्वास आहे अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी यावेळी दिली