दहावर्षाच्या मुलाला मोबाईलचा वापर ठरला जीवघेणा
पुणे :पुणे जिल्ह्यात मोबाईलचा स्फोट झाला आहे. यामध्ये दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या मुलाच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. परंतु या घटनेमुळे सर्व पालक वर्ग चिंतत आले आहेत.शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोबाईचा   स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. साहील म्हस्के असे जखमी झालेल्या मुलाचे   नाव आहे. त्याच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. त्याला पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढला आहे. कोरोनाकाळात शाळाही बंद होत्या. त्यावेळी ऑनलाईन शाळा सुरु होत्या. त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागली. आता शाळा ऑफलाईन झाल्या असल्या तरी मोबाईलाचा अतिवापर लहान मुले करत आहेत. मोबाईल अतीवापरामुळे स्फोट होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मोबाईल स्फोट होण्यामागचे अनेक कारणे आहेत.
काय आहे स्फोट होण्याची कारणे
मोबाईलचा वापर करताना तुम्ही ओरिजनल चार्जर वापरा, दुसऱ्या चार्जराचा वापरामुळे स्फोट होण्याचा धोका असतो
मोबाईल सुर्यप्रकाशात ठेऊन चार्ज केल्यावर जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा चार्जिंग पूर्ण होऊन देखील मोबाईल चार्जिंग करत ठेवला तर तो गरम होतो.
मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. पण हे असं करणं खूपच चुकीचे आहे. चार्जिंग करताना मोबाईलचे तापमान जास्त असते. त्यामुळे मोबाईल गरम होतो अन् स्फोट होण्याची शक्यता असते.
मुलांना गेम खेळाची सवय असते. पण मोबाईलवर गेम खेळताना तो जास्त तापतो. मोबाईलचे तापमान जास्त वाढत गेले तर त्याच्या बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे गेम खेळताना सावध रहा. तसेच लहान मुलांना गेम खेळायला देताना देखील विशेष काळजी घ्या.