अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; भेसळयुक्त खजूर, खारीकसह लवंगाचा ७ कोटी २५ लाखांचा साठा जप्त
 
मुंबई APMC मध्ये सणासुदीच्या काळात मोठा प्रमाणात भेसळयुक्त पदार्थाची विक्री
मुंबई APMC परिसरात भेसळयुक्त पदार्थावर होणार मोठी कारवाई
नवी मुंबई : नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम देत आहेत, तर दुसरीकडे भेसळखोरांनी धर्मरावबाबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु ठेवला आहे. यामध्ये अन्न औषध प्रशासनाकडून भेसाळ खोरांसाठी 'अर्थ' पूर्ण 'अभय' योजना सुरु झाल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे.
मुंबई apmc परिसरात मोठ्या प्रमाणत भेसळ युक्त पदार्थांची साठवणूक करून विक्री केली जात आहे व ही बाब अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना माहित असून सुद्धा ते या कडे दुर्लक्ष करत आहेत.
अन्न व औषध प्रशासना तर्फे नवी मुंबईतील महापे व तुर्भे एमआयडीसी परिसरातील क्रिसेंट कोल्डस्टोरेज या कंपनीमध्ये छापा टाकून तब्बल एक कोटी ७२ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९५ हजार ३४ किलोची भेसळयुक्त खजूर आणि खारीक तसेच तुर्भेतून पाच कोटी ५५ लाख सहा हजार ८५० रुपयांचा भेसळयुक्त लवंगाचा साठा असा सात काेटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. .या अन्नपदार्थाच्या लेबलवरही अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक व बंधनकारक मजकुराचा लेबल नव्हता. या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. अन्न औषध प्रसाधनाकडून यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती आता काही दिवसात पुन्हा यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली आहे
मुंबई APMC मसाला, धान्य मार्केट व apmc परीसरात मोठा प्रमाणात भेसळयुक्त पदार्थाची साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे, यापूर्वी देखील अन्न औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई होऊनसुद्धा अद्याप उघडपणे भेसळ करणे सुरु आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.