चिकू मागे पालघरच्या टपोऱ्या जांभळांना मिळाले भौगोलिक मानांकन
 
चिकू मागे पालघरच्या टपोऱ्या जांभळांना मिळाले भौगोलिक मानांकन
पालघर जिल्हा फळबागायत दारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून येथील चिकू प्रसिद्ध आहेत. तर चिकू या फळाला २०१६ साली डहाणू, घोलवड या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यानंतर आता जिल्ह्यात बहाडोली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जांभळाला देखील भौगोलिक मानांकन मिळाले असून बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर हे भौगोलिक मानांकन बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मिळाले आहे. याबाबत कृषी विभाग आणि 'आत्मा' अंतर्गत २०१९ पासून जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन केले जात होते. ३० मार्चला याबाबत प्रमाणपत्र मिळाले असून याचा थेट १५० शेतकऱ्यांना होणार आहे.