BIG BREAKING | देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली? पडद्यामागे घडामोडी वाढल्या
नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्रात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजप्रणित एनडीए सरकारला पायउतार करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधी पक्षांच्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आलं आहे. असं असताना आता पडद्यामागे आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 28 जुलैला पुण्यात शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं आहे. मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.