Big Breaking: समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात, १६ जणांचा मृत्यू
samruddhi mahamarg accident : काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
जखमींना रुग्णालयात
सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. आतापर्यंत १७ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
मृतांचा संख्या वाढण्याची भीती
बुलढाण्यात मागील महिन्यात समृद्धी महामार्ग मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला होता. बस पेलटल्यानंतर झालेल्या अपघातात २६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत. त्याचवेळी १ ऑगस्ट रोजी दुसरा मोठा अपघात या महामार्गावर झाला आहे. शहापूरजवळ सरळआंबाजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना हा अपघात झाला. त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजून पाच ते सहा जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प
देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. या महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते इगतपुरीपर्यंत सुरु आहे. या महामार्गावर सध्या इगतपुरीपासून ते मुंबईपर्यंतच्या टप्प्याचे काम सुरु आहे. येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते मुंबई या टप्प्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. सोमवारी रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही घटना घडली. या ठिकाणी सुरक्षेची कोणतेही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाल्या असल्याचे म्हटले जात आहे.