BIG BREAKING | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबादमधील मोठी घटना
 
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारील मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना त्यांनी औरंगाबादला जावून औरंगजेबाच्या समाधीला का भेट दिली? 
असा प्रश्न उपस्थित होतोय.