साताऱ्यातून मोठी बातमी, विद्यमान खासदाराचा निवडणूक लढण्यास नकार आमदार शशिकांत शिंदेचा नाव आघाडीवर.
-शरद पवार कुणाला उमेदवारी देणार ?याकडे सर्वांचे लक्ष
एपीएमसी न्यूज डेस्क : साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आरोग्याचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे.
साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांच्या जागी कोण? याबाबतची मते जाणून घेण्यासाठी पवार साताऱ्यात आले आहेत. यावेळी ते कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र आघाडीवर शशिकांत शिंदे यांची नाव आहेत त्यामुळे येणारे   दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल. शरद पवार कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच साताऱ्यात नवीन उमेदवार मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.