काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आता अध्यक्षपदी निवड झालीय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठील यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चांगलीच फिल्डिंग लावली होती. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
अमरामती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्ष पदासाठी अभिजीत ढेपे यांनी अर्ज भरला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी लावली जोरदार फील्डिंग लावल्याची माहिती मिळत होती. अखेर या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी निवड झालीय.