पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यासंदर्भात एटीएसकडून मोठी अपडेट, त्या दोघांना केले होते बॉम्बस्फोटाचे ट्रायल
 
दोन्ही दहशतवाद्यांचा राज्यात बॉम्बस्फोट करण्याचा होता कट
पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करत एका डॉक्टरास अटक केली आहे. डॉ.अदनान अली सरकारला याला एनआयएने अटक केली आहे. त्याचवेळी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता, अशी माहिती एटीएस सूत्रांनी दिली. या दोघांचा तिसरा साथीदार फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे.
काय होता कट
पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन जणांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेताना हे दोघे सापडले होते. त्यांची चौकशी केल्यावर ते एनआयएच्या यादीतील मोस्ट वॉटेंड दहशतवादी निघाले. त्यांना १८ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला. या दोघांकडून जप्त केलेली पावडर हे स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या दहशतवाद्यांनी पुणे, साताराच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती, ही स्पष्ट झाले. राज्यात घातपात घडवण्यापूर्वीची ही ट्रायल होती.
तिसऱ्या व्यक्तीचा शोध
दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा 436 पानांचा अहवाल कोर्टात सादर केला आहे. त्यात या लोकांनी पुणे, साताराच्या जंगलात केलेल्या स्फोटाची माहिती आहे. या प्रकरणात तिसरा अमीर अब्दुल आणि महम्मद युनूस साकी यांचासोबत असलेला तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. त्याचा फोटो एटीएसने जारी केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. परंतु तो फरार आहे.
अनेक गुन्ह्यातील आरोपी
शहानवाज आलम हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याने युसूफ खान आणि याकूब साकी यांना मदत केली होती. आलम फरार झाला आहे. एटीएसकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. परंतु अद्याप तो मिळाला नाही. यामुळे त्याचा फोटो जारी केला गेला आहे. ही तिन्ही आरोपी iSIS ची सहयोगी संघटना सुफाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात त्यांना घर देणाऱ्या अब्दुल पठाण यालाही एटीएसने अटक केली आहे.