BREAKING | जे जे रुग्णालयातील सर्वात मोठी बातमी, डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहीत 9 वरिष्ठ डॉक्टांराचे तडकाफडकी राजीनामे
 
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचादेखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.
जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. संबंधित प्रकार हा अतिशय धक्कादायक मानला जातोय. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचं नाव असल्याने हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता आहे. पण दोन्ही बाजूच्या भूमिका समजून घेतल्याशिवाय संबंधित प्रकरणावर निष्कर्ष काढता येणार नाही.
जे जे रुग्णलयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं आहे. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर 8 डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम मांडलाय. सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून 7 लाख रुपये दंड ठोठावला, अस पत्रकात म्हटलंय. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावल जात असून त्यांना भडकवण्यात जे जे च्या डिन सहभागी असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय.