Breaking: उद्या माथाडी कामगारांच्या होणारा संप स्थगित; मुख्यमंत्र्यासोवतच्या बैठकीनंतर निर्णय
 
Mathadi labour strike update :वर्ष २०२३ माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.34 मागे घेणे,माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने गुरुवार दि.14 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप केला जाणार असल्याचे नोटीस राज्य सरकार   व संबंधितांना दिली होती.यासंदर्भात   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री गृह व वित्त, कामगार व उद्योग मंत्री आणि संबंधितांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी 2-30 वाजतां नागपूर विधानसभा येथे संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक 34 स्थगित करण्याचा आणि अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना करण्यासंदर्भात मालक व कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्यामुळे   माथाडी कामगारांचा दि.14 डिसेंबर रोजी पुकरलेला संप स्थगित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अजितदादा पवार,कामगार मंत्री सुरेश खाडे,कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल,कामगार आयुक्त,गृह व उद्योग विभागाचे प्रधान सचिव,आमदार शिवेंद्रराजे भोसले,आमदार निरंजन डावखरे,आमदार भाई जगताप,आमदार प्रविण दटके,जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव,माथाडी कामगार नेते   मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,आमदार शशिकांत शिंदे,गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख,अविनाश रामिष्टे,बळवंतराव पवार,प्रकाश पाटील,अरूण रांजणे,राजन म्हात्रे,हनुमंत बहिरट,राजकुमार घायाळ,तुषार वाडीया आदी उपस्थित होते.*