संयुक्त किसान मोर्चाकडून ‘या’ दिवशी भारत बंदची हाक
 
संयुक्त किसान मोर्चाकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून येत्या 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 16 फेब्रुवारीला सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. केंद्र सरकारने एमएसपीबाबत कायदा करावा ही प्रमुख मागणी शेतकरी संघटनांची आहे. या बंदमध्ये देशभरातील शेतकरी, कामगार सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनी आधी 13 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेला जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा देण्यात आली आहे. शेतकरी चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीमा भागात प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशभरातील शेतकऱ्यांना कॉर्पोरेट नीतींच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सर्वांना एकत्र एकाच मंचावर येण्याचं आवाहन केलं आहे.