मुख्यमंत्री साहेब ; मुंबई APMCसंचालक मंडळाकडून मुक्ती द्या ...
 
-संचालक मंडळ येवून ३ वर्ष झाली विकास कामे 0
-आलेले शेतकरी प्रतिनिधी शेतकऱ्याचे नसून व्यापाऱ्याचे
-मार्केटमध्ये सर्व अनधिकृत कारभाराला संचालकाचा पाठींबा ,विकासकामे रखडली
-मुंबई APMCवर चांगल प्रशासक नियुक्त करा जेणे करून मार्केट शिस्तबद्ध चालणार
Mumbai Apmc Director News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील वर्ष २०२० ला   संचालक मंडळ अस्तित्वात आले ,संचालक मंडळ अस्तित्वात   येवून ३ वर्ष झाली . या ३ वर्षाच्या काळात संचालक मंडळाचा भोंगळ कारभारामुळे मार्केट पुनर्बांधणीसह   विकास कामे रखडली अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे . प्रशासनाच्या राजवटी हटल्याने संचालक मंडळ अस्तित्वात आले त्याकाळात महाविकास आघाडी सरकार होते .उप मुख्य्म्नात्री अजित पवार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील होते . अजित दादा यांनी राज्याच्या विकासाबरोवर बाजार समितीच्या विकास व्हावा त्यासाठी दर गुरवारी सिडको ,महापलिका मध्ये आढावा बैठक घेत होते त्यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक डक ,उप सभापती धनंजय वाडकर आणि संचालक मंडळ उपस्थित राहत होते , त्याकाळात कांदा बटाटा ,भाजीपला आणि फळ मार्केटच्या पुनर्बांधणी कशी   करावी यासाठी आर्किटेक नेमण्यात आले होते. मात्र मार्केट संचालक व अभियंता यांनी व्यापाऱ्यांना सोवत न घेता   विकासक सोवत परस्पर बैठक केले त्यामुळे सदर मार्केटच्या पुनर्बांधणीसह विकास कामे रखडले अशी चर्चा बाजार आवारत सुरु आहे .महत्वाचे बाब अशी आहे की संचालक यांच्या अंतर्गत वादामुळे मार्केट मधील जवळपास १५० कोटी रुपये चे प्रकल्प पूर्ण होऊन सुधा पडून राहिले आहे ,त्यामध्ये फळ मार्केटच्या बहुउदेषीय इमारत जे ४ वर्षापासून बिक्री बिना पडले आहे यांचे कारण प्रशासनाकडून कंत्राटदाराला जवळपास ३ कोटी रुपये बिल जास्त देण्यात आल्याची माहिती सूत्राने सांगितले आहे. त्यामध्ये आता कंत्राटदार   आणि प्रशासनाचे वाद सुरु असल्याने सदर   प्रकल्प बिक्री बिना पडून राहिले आहे . संचालक मंडळ आल्यापासून जवळपास २० ते ३० सभा घेण्यात आल्या आणि विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली .चहा .जेवण .हॉटेल आणि वाहनाच्या वापर करण्यात आली यावर   बाजार समितीच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च झाले . सभापती   अशोक डक आणि उप सभपती धनंजय वाडकर यांच्या अध्यक्ष्याताखाली जे सभा झाली ते सभा कोणासाठी होति?   अशी बाजार घटक सांगत आहे . या संचालक मंडळाने ३ वर्षाच्या काळात शेतकरी ,व्यापारी ,माथाडी कामगाराच्या प्रश्न सोडवले नाही .मार्केटमध्ये सभापती आणि संचालक मंडळाच्या काळात   , मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम ,भाजीपाला मार्केट मध्ये पसेज आणि धक्यावर अनधिकृत शेतमालाच्या व्यापार ,मार्केटमध्ये बाजार भावात तफावत मुळे शेतकरी ,ग्राहक आणि बाजार समितीला मोठ नुकसान ,बाजार आवारत महागडे शेतमालाची आवक नोंद नाही ,   बाजार आवारत फुटपाथवर सटाल मुळे वाहतूक कोंडी , गांजा ,दारू ,गुटखा उघडपणे विक्री , हे सर्व ३ वर्षात वाढले आणि   विकासकामे रखडली. व्यापार्यांकडून कोट्यावधी रुपायची सेस भरून सुधा रस्ते ,गटार ,पिण्याचे पाणी मिळत नाही . या संचालक मंडळामुळे सर्वात जास्त फटका बाजार घटकांना लागली आहे त्यामुळे   बाजार घटक सांगतात आम्हाला संचालक मंडळ नको.मार्केटमध्ये खरीदीचा माल येत असल्याने शेतकरी प्रतीनिधी नको , मार्केट मध्ये एक चांगल प्रशासक नियुक्ती करण्याची मागणी जोरधारू लागली आहे . सूत्राने सांगितल प्रमाणे काही सामाजिक संस्थाने संचालक विरोधात कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे .