Chilli powder लाल मिरची झाली स्वस्त ; तिखट होईल मस्त, पाहा मुंबई APMC मार्केटमध्ये कसा मिळतोय बाजारभाव
 
Chilli powder: मिरचीचा हंगाम सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.गतवर्षी मिरची व पावडरचे देखील दर वाढले होते. मात्र, यावर्षी दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.यावर्षी मिरचीचे दर नियंत्रणात आहेत. हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत. मार्च व एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची मागणी वाढणार असून, यंदा भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात मिरचीचे दर काय आहेत पाहूया या रिपोर्ट मध्ये
-मिरचीचे बाजारभाव
लवंगी-२५० ते २७५
तेजा-२२० ते २५०
ब्याडगी-३५० ते ४००
काश्मिरी-४५० ते ५००
गुंटूर-२७५ ते ३२५
तेजा-२२५ ते २५०
काश्मिरी-६२५ ते ६५०
पांडी-१८० ते २००