टीव्हीवरुन सत्तापालटाची घोषणा, बॉडीगार्डनीच राष्ट्रपतींना बनवलं बंदी
 
नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकी देश नायजेरमध्ये बुधवारी तख्तापलट झाला आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी देशात सत्तापालट झाल्याच जाहीर केलं आहे. विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद बेजोम यांना बंदी बनवलं आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी लाइव्ह टीव्हीवरुन सत्ता बदलाची घोषणा केली आहे. राष्ट्रपतींना बंदी बनवणाऱ्यांमध्ये त्यांचे अंगरक्षकही सहभागी आहेत. जगातील अनेक देशांनी या घटनेची निंदा केलीय.
देशातील सर्व संस्था बंद करण्यात आल्या आहेत. देशाच्या बॉर्डरही बंद आहेत. बाहेरच्या देशातून कोणालाही आत येता येणार नाही. बुधवारीच राष्ट्रपतीला बंदी बनवण्यात आलं आहे. बीबीसीने हे वृत्त दिलय.
अंगरक्षकांनी बंदी बनवलय
राष्ट्रपतींना बंदी बनवण्यात आल्याच समजल्यानंतर राष्ट्रपती भवनाजवळ त्यांचे समर्थक जमा होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रपतींना त्यांच्या अंगरक्षकांनी बंदी बनवलय. मोहम्मद बाजुम वर्ष 2021 मध्ये नायजेरचे राष्ट्रपती झाले होते. निवडणुकीत त्यांच्या विजयानंतर गादी संभाळण्याआधी तख्तापालटच प्रयत्न झाला होता .या देशात 1960 नंतर चारवेळा लष्करी राजवट लागू झालीय. नायजेरच राष्ट्रपती बाजुम यांना पाश्चिमात्य देशांच समर्थन होतं. नायजेर अलकायदा आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात सतत कारवाई करत होते.