राज्याच्या सहकार आयुक्तपदी दीपक तावरे यांची नियुक्ती
पतसंस्थामधे कोट्यवधी रुपयांची घोटाळाकरुन मोकाट फिरणारे त्या अध्यक्षवर कारवाई होणार या तारीख मिळणार ?
पुणे: राज्याच्या रिक्त असलेल्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी बारामती तालुक्यातील माळेगाव येथील दीपक रामचंद्र तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी शासनाने जारी केले.
तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी व सहकारचे अपर आयुक्त शैलेश कोथमिरे यांच्याकडे देण्यात आला होता. आता दीपक तावरे यांच्या नियुक्तीने सहकार आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कामकाजास गती मिळणार असे बोलले जात आहे. 
दीपक तावरे यांची राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन मुंबई येथे राज्य कामगार विमा योजना येथे आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर पुण्यात यशदाच्या उप-महासंचालक पदी बदली झाली होती. या दोन्ही पदांवर ते रुजू झाले नव्हते. आता शासनाने त्यांची नियुक्ती सोमवारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे या रिक्त पदावर केलेली आहे. हे पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करुन ही नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांनी काढले आहेत.
दीपक तावरे यांनी सहकार विभागात यापुर्वी विविध पदावर काम केले   असून पुणे विभागीय सह निबंधक, साखर सहसंचालक या पदावर त्यांनी काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांची राज्याच्या पणन संचालक पदी नियुक्ती झाली होती. तावरे पणन संचालक पदी रुजू झाल्यावर पहिल्या   मुंबई APMC प्रशासकीय इमारतीत भेट दिले होते .त्यावेळी त्यांचे सत्कार तत्कालीन प्रशासक सतीश सोनी यांनी केला होता .तसेच   केंद्र सरकारच्या eNam केंद्राच्या उद्घाटन तावरे यांच्या हातातून करण्यात आला होता . उद्घाटन झाल्यानंतर काही दिवस सुरु होता नंतर बंद पडला .भारतीय प्रशासन सेवेच्या   पहिला पोस्टिंग मधे उद्घाटन झाल्यानंतर बंद पडलेला eNam केंद्र आता पर्यंत सुरू झाली नाही .
गैरव्यवहार करणाऱ्या नवी मुंबईतील फळ मार्केटमधे एका   पतसंस्थांना राजकीय नेत्यांचे पाठबळ आणि हितसंबंधांमुळे फार मोठी कारवाई झाली नाही. स्वतःची सेटलमेंट करून चेअरमन आणि संचालक मंडळ आता सध्या मोकाट आहेत,त्या पतसंस्था मधे काही पदाधिकारी संस्था बिरोधात न्यायालयात गेले आहे .सहकार आयुक्त कडून मिळतो ‘तारीख पे तारीख ‘
यावर नवीन सहकार आयुक्त काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे .