ब्राझीलचा सफरचंद , पेरूचे ब्लूबेरी सह परदेशी फळांना मागणी
ब्राझीलचा   सफरचंद , पेरूचे ब्लूबेरी सह परदेशी फळांना मागणी
सफरचंद मधे न्यूझीलँड रॉयल गाला लेय भारी
मुंबई Apmc फळ मार्केट मध्ये परदेशी सफरचंद ट्रेंडिंगला
जाणून घ्या विविध परदेशी सफरचंद आणि त्यांचे दर
इराण,ब्राझील , न्यूझीलँड   , साऊथअफ्रीका , अर्जेंटीना , चिली रॉयल गाला बाजारात दाखल
परदेशी   सफरचंदाला ग्राहकांची पसंती
नवी मुंबई: मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशी फळांसह परदेशी फळांना चांगलीच मागणी वाढली आहे. तर ग्राहक देखील या फळांना पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील हि परदेशी फळे ग्राहकांचे खास आकर्षण ठरली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ खरेदीला गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शिवाय विविध देशांमधून हि फळे बाजारात येत असल्याने परदेशी फळ खरेदीचा आनंद ग्राहक घेत आहेत. तर   सफरचंद ६० ते २४० ,ब्राझील १८०-२०० , ब्लूबेरी २५०० रुपये प्रतिकिलो, हापूस आंबा ८०० ते १००० रुपये डझन,   चिकू ३० ते ४० रुपये प्रतिकिलो   , डाळिंब ८० ते १४० रुपये किलो, द्राक्ष ४० ते ३०० रुपये किलो, कलिंगड १५ ते २० रुपये किलो , स्टावबेरी ९० ते १५० रुपये प्रतिकिलो , चिली किवी ३०० रुपये प्रतिकिलो , ड्रॅगन फ्रुट १०० , इजिप्त संत्री ९० ,   साउथ आफ्रिका पलम   २०० दराने विकले जात आहे अशी प्रतिक्रिया फळ व्यापारी शिव कुमार यांनी दिली आहे