ED चा झटका: वसई महापालिका आयुक्तांवर कारवाई, हितेंद्र ठाकूर आणि शिंदे गट अडचणीत!

-पवार यांनी दरवाजा बंद करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप
-१२ ठिकाणी ईडीची एकाचवेळी धाड
-वाय.एस. रेड्डी यांच्या जबाबावरून कारवाईची दिशा
-ठाकूर वर्चस्वाला सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती?
मुंबई | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED ) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी सातपासून पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानासह पुणे, नाशिकसह एकूण १२ ठिकाणी छापे टाकले. पवार यांनी सुरुवातीला ईडी अधिकाऱ्यांना घरात प्रवेश नाकारला आणि एक तास दरवाजा बंद ठेवून पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. कागदपत्रे आणि रोख रक्कम फ्लश केल्याचीही माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या बदलीच्या आदल्याच दिवशी निरोप समारंभ झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाली. त्यांच्यावर आयुक्तपदावर असताना २५० पेक्षा अधिक इमारतींना ऑफलाइन मंजुरी, बेहिशेबी संपत्ती आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत.
ही कारवाई नगररचना विभागाचे बडतर्फ उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या जबाबावरून पुढे आली असून, रेड्डी यांच्या घरातून ३३ कोटींचा ऐवज जप्त झाला होता. त्यानंतर पवार यांच्यावरही संशय गडद झाला होता.
राजकीय वर्तुळात भाजपने ही संधी साधून वसईतील ठाकूर कुटुंबाचे वर्चस्व डगमगवण्याचा आणि शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या जाहिर (ज्ञात) मालमत्तेचा तपशील
1. नाशिक जिल्ह्यातील शेती जमीन आणि फार्म हाऊस
* स्थान:   बागलाण तालुक्यातील सटाणा जळील खामताणे गाव, नाशिक जिल्हा.
* क्षेत्रफळ: 0.41 हेक्टर व 0.45 हेक्टर जमीन, एक छोटे फार्म हाऊस (400 चौरस फूट).
* स्रोत: स्वतःच्या नावाने खरेदी.
2. बागलाण (नाशिक) येथील बिगरशेती जमिनी
* गाव: आरई, तालुका बागलाण.   * एकूण   तिन भूखंड (Plot)
* Plot 1: ₹3,22,560 (सरकारी मूल्यांकन), बाजारभाव ₹60 लाख.
* Plot 2: ₹1,44,000 (सरकारी मूल्यांकन), बाजारभाव ₹22 लाख.
* Plot 3: ₹45 लाख बाजारभाव.
* नावावर: दिवंगत माता – सौ. निर्मलाबाई खंदेराव पवार.
3. नाशिक तालुक्यातील बिगरशेती भूखंड
* गाव: पाथर्डी, भूखंड क्रमांक 244/39.
* क्षेत्रफळ: 413.25 चौ.मी.
* सरकारी मूल्यांकन: ₹1,42,900/-
* बाजारभाव: ₹50 लाख.
* संपत्तीचे मूळ मालक: पुतण्या तुषार विजय पवार.
* हस्तांतरण: पुतण्याने आजी – निर्मलाबाई पवार यांना भेट दिले, नंतर त्यांच्या इच्छेनुसार अनिलकुमार पवार यांना दिले.
4. पुण्यातील फ्लॅट (Flat No. 402)
* स्थान: DSK हरियाळी मोदी बाग, शिवाजीनगर, पुणे.
* क्षेत्र: 120 चौ.मी. + 60 चौ.मी. पार्किंग (एकूण 180 चौ.मी.).
* खरेदी किंमत: ₹77 लाख.
* बाजारमूल्य: ₹1.94 कोटी.
* संपत्ती प्राप्तीचा स्रोत: आईला नातवाने दिलेले गिफ्ट, त्यानंतर आईने वसीयत करून अनिलकुमार यांना दिले.
5. सटाणा येथील दुसरा फ्लॅट (Flat No. 403)
* क्षेत्रफळ: 50 चौ.मी. + 45 चौ.मी. टेरेस (एकूण 95 चौ.मी.).
* खरेदी किंमत: ₹28 लाख.
* सध्याचे बाजारमूल्य: ₹30 लाख.
* संपत्तीचे नाव: अरुण खंदेराव पवार (भाव).
* वाटप पद्धत: कुटुंबीयांच्या सहमतीने अनिलकुमार यांना गिफ्ट.