लाल मिरची सह जिराच्या दरात घसरण गृहिणींना दिलासा
 
नवी मुंबई : उन्हे तापायला सुरुवात झाली की अनेकजण मसाला करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांचे दर घाऊक बाजारातच ४०० ते ७०० रुपये किलो झाले होते. मात्र आता हे दर १५० ते ३५० रुपयांनी झाली आहे .त्यामुळे लाल मिरीची सह जिराच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लाल मिरचीची आवक जानेवारीपासूनच सुरू झाली असून दरही आवाक्यात असल्यामुळे गृहिनींना दिलासा मिळाला आहे.तसेच जिराच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे .गुजरातच्या ऊंझातुन   जिराच्या आवक होत आहे . ६ महिन्या पाहिले घाऊक बाजारात जिरा ४५० ते ६०० रुपये किलो झाले होते. मात्र आता हे दर १८० ते ३०० रुपयांनी झाली आहे .
मुंबई एपीएमसीतील   घाऊक मसाला मार्केटमध्ये   सध्या लाल मसाल्याच्या मिरच्यांची आवक वाढू लागली आहे. सध्या मिरचीच्या २० ते ३० गाड्या दररोज घाऊक बाजारात येत आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. त्यामुळे या काळात मसाला बाजारात सर्वत्र लाल मिरच्यांचा ठसका लागतो. एप्रिलमध्ये बहुतेक शाळांच्या परीक्षाही संपलेल्या असतात. त्यानंतर बहुतेक जण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने अनेकांचा कल त्याआधीच लाल मसाला तयार करून घेण्याकडे असतो. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मसाल्याच्या लाल मिरचीला जास्त मागणी असते. त्यानुसार लाल मिरचीला मागणी वाढू लागली आहे.साधारणतः मर्कटमध्ये येणाऱ्या मिरची या तीन महिन्यात सर्वात जास्त येतात . शिल्लक राहिलेले   मिरची व्यापारी साठवणूक करून ते वर्षभर विकतात .
नवी मुंबई एपीएमसी बाजारात सध्या लाला मिरचीची मोठी आवक होत असून स्थानिक भागासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी भागांतून लाल मिरची दाखल होत आहे. बाजारात ब्याडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची उपलब्ध आहे. गेल्यावर्षी ब्याडगी ४०० ते ७०० रुपये होते आता १५० ते ३५० रुपये प्रतिकिलो ,काश्मीर ६०० ते ९०० रुपये किलो होते आता २५० ते ४५०,पांडी २५० ते ३०० रुपये होते आता १६० ते २१० रुपये प्रतिकिलो ,तेजा २६० ते ३०० रुपये किलो होते आता १९० ते २४०,रेशम पट्टी ६०० ते ८०० रुपये होते आता २२५ ते ४२५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे .गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरची सह जिऱ्याचा भावात मोठा घसरण झाली आहे. तर साफ केलेल्या, देठ तोडलेल्या मिरच्यांसाठी किलोमागे २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागतात, अशी माहिती विक्रेते अमरीशलाल बारोट यांनी दिली.
ब्याडगी -१५० ते ३५० --४०० ते ७००
काश्मीर -२५० ते ४५० --६०० ते ९००
पांडी -१६० ते २१० --२५० ते ३००
तेजा -१९० ते २४०--२६० ते ३००
रेशम पट्टी -२२५ ते ४२५ --६०० ते ८००