तापमानात चढ उतार ; राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
 
पुणे: राज्याच्या प्रचंड   तापमानात थोडीशी घट झाली आहे. मात्र उन्हाची ताप आणि उकाडा टिकून आहे. वाढलेल्या चटक्याने विदर्भ पोळला असून, उर्वरित राज्यातही झळा कायम आहेत. आज राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, गोंदिया, अकोला, नागपूर येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.
दक्षिण हरियाणापासून सिक्कीमपर्यंत पूर्व-पश्चिम, तसेच मध्य प्रदेशपासून, विदर्भ, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत दक्षिणेत्तर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. आज उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका आणि दमट हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे.
पुणे ३६.२ (२४.४),
जळगाव ४१.२ (२६.३), 
धुळे ४०.६ (२२.२), 
कोल्हापूर ३४.२ (२३.९)
महाबळेश्वर ३०.६ (१८.५)
नाशिक ३६.३ (२३.८),
निफाड ३७.६ (२५.६)
सांगली - (२३.८)
सातारा ३५.८ (२३.७)
सोलापूर ३९.२ (२४.४)
सांताक्रूझ ३३.९ (२६.८)
डहाणू ३५.३ (२९.०)
रत्नागिरी ३४.४ (२६.५),
छत्रपती संभाजीनगर ३९.४ (२१.६),
नांदेड ४१.२ (२७.४),
परभणी ४०.५ (२६.५),
अकोला ४२.० (२६.८)
अमरावती ४१.६(२५.४)
बुलढाणा ३९.२ (२४.६)
ब्रह्मपूरी ४१.४ (२७.०),
चंद्रपूर ४३.२(२६.०),
गोंदिया ४२.१ (२६.०)
नागपूर ४२.० (२६.२)
वर्धा ४२.५(२८.२),
वाशीम ४०.२(२५.४)
यवतमाळ ३९.७ (२५.५)