मुंबई APMC घाऊक बाजारात लसूणच्या दरात घसरण ; लसूण 50 ते 110 किलोने विक्री
 
नवीन लसूणाची आवक वाढली
नवी मुंबई : या हंगामातील नवीन लसूणाची आवक घाऊक बाजारात वाढायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आत्ता लसूणाचे दर खाली यायला सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात ३०० ते ३५० रु किलो झालेले लसूणाचे दर आता या आठवड्यात ५० ते ११० रु किलो वर आले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात हि लसूणच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण १५० ते २०० रु किलो पर्यंत आले आहेत .यावर्षी लसूणाचे उत्पादन समाधानकारक झाले असल्याने, वर्षभर लसूणाचे दर स्थिर राहतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
गेल्या वर्षी लसूणाची लागवड कमी झाल्याने बाजारात हि लसूणाचा पुरवठा कमी होत होता. त्यामुले बाजारात मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने ,लसूणच्या दरात वाढ झाली होती. सरासरी ५० ते १०० रु किलो असणारा लसूण अगदी ३०० ते ३५० रु किलो वर गेला होता. परिणामी किरकोळ बाजारात तर लसूण ५०० रु किलो पर्यंत विकला जात होता. त्यामुले लसूणाची खरेदी करणे फारच खर्चिक झाले होते. परिणामी लोक रेडिमेड लसूणाची पेस्ट चा वापर करू लागले होते. तर अनेक जण एक किलोच्या जागी पाव किलो लसूण खरेदी करत होते. 
मात्र आत्ता या आठवड्यापासून बाजारात लसूणाची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. आता पर्यंत बाजारात दररोज ५० किलो वजनाच्या   १५०० ते २००० लसूणच्या गोणी बाजारात येत होत्या. मात्र आता दररोज ४००० लसूणच्या गोणी बाजारात येत आहेत. मध्यप्रदेश मधून हि लसूणाची आवक होत आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी लसूणाची लागवड केलेली आहे. आणि पीकही चांगले आहे. त्यामुले लसूणाची आवक हि चांगली होत आहे. शिवाय लसूणही चांगल्या प्रतीचा आहे.
गेल्या वर्षी लागवड कमी झाल्याने लसूणाचे उत्पादन घटले होते. मात्र यावर्षी लागवड चांगली झाली आहे आणि उत्पादन हि चांगले आहे. त्यामुळे बाजारात लसूणाची आवक वाढली आहे. वर्षभर हि आवक अशीच राहणार असल्याची आशा आहे. त्यानुसार या वर्षभर लसूणाचे दर हि आवाक्यात राहतील - दीक्षित शहा लसूण घाऊक व्यापारी .