Government Scheme | 1500 पेक्षा अधिक सरकारी योजनांची माहिती एक साथ! येथे करा क्लिक
 
नवी दिल्ली | 3 February 2024 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवितात. या योजनांची एकत्रित माहिती असेल तर तुम्हाला योजनांविषयीची अपडेट अवघ्या एका क्लिकवर मिळते. या योजना तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. त्यांची इत्यंभूत माहिती मिळेल. या योजना तरुण, महिलांसाठी उपयोगी आहे. सर्वच वर्गासाठी या योजना आहेत. त्याची माहिती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल. पण त्याविषयीची माहिती अनेकांना नसते. या सरकारी पोर्टलवर तुम्हाला ही माहिती एकत्र मिळेल.
सर्व योजना एकाच ठिकाणी
या सरकारी योजनांची, एकाच ठिकाणी, एका छताखाली तुम्हाला माहिती घेता येईल myschme.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला योजनांची माहिती घेता येईल. कोणत्याही सरकारी योजनेची माहिती या संकेतस्थळावर सहज उपलब्ध आहे. हे पोर्टल उघडल्यावर त्यावर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्ही योजनेचे नाव टाईप केले तर ती योजना पुढ्यात येईल. त्या योजनेची इत्यंभूत माहिती मिळेल. या साईटवर तुम्हाला 1500 पेक्षा अधिक सरकारी योजनांची माहिती एका क्लिकवर मिळेल.
सरकारी सेवांचा लाभ
-आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करणे, जन्म प्रमाणपत्र
-इतर सर्व सरकारी सेवांची माहिती एकाच क्लिकवर
-Service.india.gov.in या पोर्टलवर सर्व सेवांची माहिती
-या पोर्टलवर अर्थ मंत्रालयाच्या 121 सेवा उपलब्ध
-निवृत्त वेतनासंबंधीच्या 60 सेवा मिळतील
-आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 72 सेवा
-इतर पण अनेक सेवा या पोर्टलवर उपलब्ध आहेत
-या साईटवर गेल्यावर इतर साईटवर जाण्याची गरज नाही
-तुम्हाला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही
-या साईटवरुन मिळतील अनेक सरकारी सेवा एकाच क्लिकवर
ही माहिती द्यावी लागणार
-myschme.gov.in या पोर्टलवर सर्व योजनांची माहिती
-पोर्टलवर सर्च बॉक्समध्ये योजनेचा शोध घेता येईल
-या पोर्टलवर क्लिक करताच तुम्हाला लिंग आणि वयाची माहिती द्यावी लागेल
-त्यानंतर राज्याचे नाव, तुमचा प्रवर्ग, सामान्य एससी, एसटी वा ओबीसी ते नमूद करा
-इतर तपशील जमा करा. त्यानंतर सर्व योजनांची माहिती समोर येईल