ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्यांचंच नाव विसरला गोविंदा
मावळ: अभिनेता गोविंदा यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर ते मुंबईतील एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान एकनाथ शिंदेंनी त्यांना स्टार प्रचारक म्हणून घोषित केलं आणि उदेमवारांच्या प्रचारासाठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मात्र ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला त्यांचेच नाव विसरल्याचा गोविंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारसभेदरम्यान मतदानाची तारीख विसरले होते. त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.  
महायुतीचे स्टार प्रचारक सुपस्टार आणि शिवसेनेत नव्याने सक्रिय झालेले गोविंदा सध्या महायुतीचा मावळमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. रविवारी श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी गोविंदा उपस्थित होते आणि त्यांनी इथे रोड शो देखील केला. पण तो नेमक्या कोणाच्या प्रचारासाठी मावळमध्ये आला हेच विसरला.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघात गोविंदा आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या प्रचारानिमित्त रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी तो आला होता, त्या श्रीरंग बारणेंचं नावच तो विसरलास. शेवटी शेजारी बसलेल्या भाजप आमदारानं त्यांना आठवण करुन दिली.