दहशतवाद्यांना त्याने फक्त घरच दिले नाही, आणखी इतर सुविधा दिल्या, एटीएसने केला खुलासा
 
नवी मुंबई I   28 जुलै 2023 : पुणे शहरात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी अटक करण्यात आली. दीड वर्षापासून शहरात राहणाऱ्या या दोघांना एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणात पकडले होते. यावेळी त्यांची चौकशी करताना ते घाबरले. त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. त्यांची नावे त्यांनी खोटी सांगितली. ट्रू कॉलरमध्ये त्यांची खरी नावे समजली. त्यानंतर ते जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित आरोपी असल्याचे कळून आले.अब्दुल पठाण याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याला न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत त्याला कोठडी दिली.पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना अटक केली होती. या दोघांना कोंढवा येथे घर देणारा अब्दुल पठाण याला अटक केली आहे. त्याला या दोघांची पार्श्वभूमी माहिती असतानाही त्यांना घर भाड्याने दिले. तसेच त्यांना ग्राफिक डिझाईनचे काम दिले. त्यासाठी त्या दोन्ही दहशतवाद्यांना आठ हजार रुपये मासिक पगार अब्दुल पठाण देत होता, असा खुलासा एटीएसने न्यायालयात केला आहे. पोलिसांनी अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. ATS कडून त्याचा फोटो जारी करण्यात आला आहे. त्याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती.आता त्याची शोध ATS घेत आहेत .