ISIS Module | पडघा गाव म्हणजे ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया), महाराष्ट्रातील ISIS च्या मॉड्यूलबाबत मोठा खुलासा
 
मुंबई : महाराष्ट्रातील ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलबाबत मोठा खुलासा झाला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाखल केलेल्या आरोपपात्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दहशतवादी मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ISIS शी संबंधित संघटनेला दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी निधी पुरवला होता. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय की “आरोपी शर्जील शेखने त्याचे कोटक महिंद्रा बँक खाते वापरून सीरियास्थित ‘द मर्सिफुल हँड्स’ या संस्थेला $176 (₹14,600) दान केले होते”
एजन्सीने असा दावा केला आहे की, “दुसरा आरोपी, झुल्फिकार अली बडोदावाला, मे-जून 2022 मध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली या गावात गेला, त्यांच्या म्हणण्यानुसार पडघा गाव हे भारतातील ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया) होतं” एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आलेत. एनआयएला शर्जील शेखच्या सेल फोनमधून व्हिडिओ सापडले आहेत, जे सक्रिय दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभागाचे भक्कम पुरावे आहेत.
गळा चिरण्याचा व्हिडिओ
ज्यावर इस्लामिक स्टेट (ISIS) चा झेंडा होता, गोळीबार करण्याचे व्हिडीओ, सीरियामधील मास्क घालून चालतानाच व्हिडीओ असल्याच पाहायला मिळालय. आयसीसच्या खलिफाची भाषणं, पाकिस्तान आणि सीरियाच्या विलायहची भाषणही फोनमध्ये सापडली आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला जात होता. आयसीसच्या दहशतवाद्यांकडून एका व्यक्तीचा गळा चिरण्याचा व्हिडीओही सापडला होता.
मेलद्वारे आरोपी हे आयसीसच्या संपर्कात
व्हॉइस ऑफ हिंदची प्रचार पत्रिका आणि इतर जिहादी कागदपत्रही आरोपींच्या फोनमध्ये सापडली आहेत. आरोपींच्या फोनमध्ये प्रक्षोभक भाषणाचे व्हिडीओ, देशाबाहेर मुस्लिमांच्या होत असलेल्या हत्या, खिलाफत आणि इतर संघटनांच्या पत्रिका अशी कागदपत्रे सापडली आहेत. आरोपी तबीश सिद्दीकी आणि बरोदावाला यांनी बयाथ घेतली होती. व्हॉटसॅपवर आरोपी संपर्कात होते, प्रक्षोभक भाषणे आणि लिंकही शेअर केल्या जात होत्या. मेलद्वारे आरोपी हे आयसीसच्या संपर्कात होते हेही स्पष्ट झालंय.मुंबई : महाराष्ट्रातील ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलबाबत मोठा खुलासा झाला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाखल केलेल्या आरोपपात्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दहशतवादी मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ISIS शी संबंधित संघटनेला दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी निधी पुरवला होता. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय की “आरोपी शर्जील शेखने त्याचे कोटक महिंद्रा बँक खाते वापरून सीरियास्थित ‘द मर्सिफुल हँड्स’ या संस्थेला $176 (₹14,600) दान केले होते”
एजन्सीने असा दावा केला आहे की, “दुसरा आरोपी, झुल्फिकार अली बडोदावाला, मे-जून 2022 मध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली या गावात गेला, त्यांच्या म्हणण्यानुसार पडघा गाव हे भारतातील ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया) होतं” एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आलेत. एनआयएला शर्जील शेखच्या सेल फोनमधून व्हिडिओ सापडले आहेत, जे सक्रिय दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभागाचे भक्कम पुरावे आहेत.
गळा चिरण्याचा व्हिडिओ
ज्यावर इस्लामिक स्टेट (ISIS) चा झेंडा होता, गोळीबार करण्याचे व्हिडीओ, सीरियामधील मास्क घालून चालतानाच व्हिडीओ असल्याच पाहायला मिळालय. आयसीसच्या खलिफाची भाषणं, पाकिस्तान आणि सीरियाच्या विलायहची भाषणही फोनमध्ये सापडली आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला जात होता. आयसीसच्या दहशतवाद्यांकडून एका व्यक्तीचा गळा चिरण्याचा व्हिडीओही सापडला होता.
मेलद्वारे आरोपी हे आयसीसच्या संपर्कात
व्हॉइस ऑफ हिंदची प्रचार पत्रिका आणि इतर जिहादी कागदपत्रही आरोपींच्या फोनमध्ये सापडली आहेत. आरोपींच्या फोनमध्ये प्रक्षोभक भाषणाचे व्हिडीओ, देशाबाहेर मुस्लिमांच्या होत असलेल्या हत्या, खिलाफत आणि इतर संघटनांच्या पत्रिका अशी कागदपत्रे सापडली आहेत. आरोपी तबीश सिद्दीकी आणि बरोदावाला यांनी बयाथ घेतली होती. व्हॉटसॅपवर आरोपी संपर्कात होते, प्रक्षोभक भाषणे आणि लिंकही शेअर केल्या जात होत्या. मेलद्वारे आरोपी हे आयसीसच्या संपर्कात होते हेही स्पष्ट झालंय.