Judge Dhananjay Nikam: न्याय देणारेच अडकले चक्क लाचप्रकरणात ! जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल
Satara ACB Trap | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau Pune) चक्क जिल्हा सत्र न्यायाधीश (District Sessions Judge)आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम (Judge Dhananjay Nikam) यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Case Filed Against Satara District Sessions Judge) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला आहे. (Satara Bribe Case) तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी आनंद आणि किशोर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. (Satara ACB Trap On Judge) जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.