खारघर-नेरूळ सागरी मार्ग थेट NMIA विमानतळाशी जोडणार – CM फडणवीस यांची घोषणा

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा! खारघर-नेरूळ कोस्टल रोड थेट विमानतळाशी जोडणार – CM फडणवीस यांची घोषणा
मुंबई ,एपीएमसी न्यूज नेटवर्क :
नवी मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. खारघर ते नेरूळ दरम्यानच्या प्रस्तावित सागरी किनारा मार्गाचा थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (NMIA) संपर्क साधला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा बदल विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, NMMC आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.