दिवसाला 12 तास काम, ओव्हरटाईमची मर्यादा वाढली; मंत्रिमंडळाची मान्यता, सुट्टीचेही बदलले निकष, जाणून घ्या सविस्तर

मुंबई ,एपीएमसी न्यूज नेटवर्क: राज्यातील कामगारांसाठी मोठा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे आता कारखान्यांमध्ये दिवसाला ९ ऐवजी १२ तास काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर दुकाने व आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, “उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कामकाजात लवचिकता आवश्यक होती. यामुळे कारखान्यांना अधिक वेळ काम घेता येणार आहे, मात्र कामगारांची लेखी संमती आणि सरकारची परवानगी बंधनकारक असेल.”