राज्यात मुसळधार पावसाचा कहर! 24 तासांत 6 बळी, 4 हजार नागरिकांचे स्थलांतर

एपीएमसी न्यूज नेटवर्क:
राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत या नैसर्गिक आपत्तीत 6 जणांचा बळी गेला आहे. तर 4,088 नागरिकांना पूरग्रस्त भागांतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
बचावकार्यासाठी लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत फक्त एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने 3,643 नागरिकांचा जीव वाचवण्यात आला आहे.
स्थलांतरित नागरिकांचा आकडा (प्रमुख जिल्हे):
• जळगाव: 231
• सोलापूर: 1,015
• बीड: 1,617
• परभणी: 578
• अहमदनगर: 465
यापैकी सोलापूर आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.
बचाव कार्यवाही:
• धाराशिव: 182 लोकांना लष्कर आणि एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढले.
• जळगाव: 160 लोकांचा स्थानिक प्रशासनाने बचाव केला.
• सोलापूर: 1,015 लोकांना एनडीआरएफ आणि प्रशासनाने बाहेर काढले.
• बीड: 1,617 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
• परभणी: 578 नागरिकांना बाहेर काढले.
• अहमदनगर: 91 लोकांचा बचाव एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासनाने केला.
दरम्यान, सरकार व प्रशासन या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, पाऊस ओसरल्यानंतर नुकसानग्रस्त भागांमध्ये मदतकार्य जलद गतीने सुरू करण्याची तयारी केली जात आहे.