Maratha Reservation : मराठ्यांना 10% आरक्षण, माथाडी नेते बांधवांसोबत जल्लोष
-"मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10% आरक्षण" मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
-माथाडी भवन येथे स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास   पुष्पहार घालून अभिवादन
-मराठा समाज बांधव,माथाडी नेते व कामगार यांनी पेडे ,फटाके गुलाल टाकून केला  
जल्लोष
नवी मुंबई : मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या पटलावर आरक्षणाचे विधेयक मांडले. सत्ताधारी आणि विरोधकांनी या विधेयकाला संमती दर्शवली. त्यामुळे आता मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
मराठा क्रांतीसुर्य, स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदाना पासून (२३ मार्च १९८२) मराठा समाजाची असलेली मूळ मागणी "मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १०% आरक्षण" महायुती सरकारकडून विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आले. त्याबद्दल माथाडी भवन येथे   स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास तमाम मराठा समाज बांधव, माथाडी कामगार यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा समाज बांधव, माथाडी कामगार वर्गाने   आरक्षण दिल्याबद्दल महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार   यांचे आभार व्यक्त केले.यावेळी माजी मंत्री आ.शशिकांत शिंदे, माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, दिलीप खोंड, चंद्रकांत पाटील, मा.नगरसेवक रविकांत पाटील, मा.नगरसेविका सौ. भारती पाटील उपस्थित होते.