मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक, तोडग्यासाठी चर्चेवर भर – अजित पवार

मुंबई |
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले असून, मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर जमले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
“प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे तो शांततेत व्हावा. सरकारने विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली कमेटी स्थापन केली आहे. चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल,” असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलन लोकशाही मार्गाने होत असल्याचे सांगत, “शासनाची सहकार्याची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.