मोबाईलमुळे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा
नवी मुंबई : भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना खांदेश्वर परिसरात घडली आहे. सोशल मीडियावरील अश्लील व्हिडिओच्या मोहात पडलेल्या या भावंडाने पॉर्न व्हिडीओ पाहत शरीरसंबंध केले. त्यामध्ये १५ वर्षीय मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल देणे घातक ठरत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर येत आहे. मुलांकडून मोबाईलचा वापर नेमका कशासाठी होत आहे याकडे पालकांचा होणारा कानाडोळा धोक्याचे संकेत देत आहे. अशातच अल्पवयीन संख्या भाऊ बहिणीने मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत शरीरसंबंध केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षाची मुलगी असून १३ वर्षाचा मुलगा आहे. सोशल मीडियावरील अश्लील व्हिडिओंमुळे त्यांच्यात सेक्स बद्दलची उत्सुकता वाढली होती. यामुळे दोघांनी घरात कोणीही नसताना मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ बघत एकमेकांसोबत शरीरसंबंध करण्याचा अनेकदा प्रयत्नकरूनही त्यांना अपयश येत होते. मात्र जानेवारीमध्ये त्यांनी पुन्हा तसे कृत्य केले असता त्यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिच्यातल्या शाररिक बदलामुळे कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. यावेळी दोघा भाऊ बहिणीने संमतीने व्हिडीओ पाहत शरीसंबंध केल्याची कबुली दिली. पीडित मुलीला गर्भपातासाठी रुग्णालयात नेल्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनात आला आहे. त्यानुसार अल्पवयीन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.