धक्कादायक! मुंबई पोलिसांची मोठी कारवाई - 29 कोटींचा ड्रग्ज साठा नष्ट; 1269 कफ सिरप बाटल्या, 18 हजारांहून अधिक गोळ्यांचा समावेश!

मुंबई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ₹29 कोटी 76 लाखांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी नष्ट केला आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये करण्यात आलेल्या या कारवाईत गांजा, चरस, मेफेड्रोन, हेरॉईन, कोकेन, तसेच 1269 कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या, 12,730 अल्प्राझोलम गोळ्या आणि 5,752 ट्रॅमाडोल टॅब्लेट्स यांचा समावेश होता.
240 किलो 420 ग्रॅम अमली पदार्थांचा साठा नष्ट
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध 27 गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेले पदार्थ नुकतेच तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीत नष्ट करण्यात आले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या कक्ष-1 च्या पथकाकडून करण्यात आली.
गुन्हे आणि आकडेवारी
-कालावधी : 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर
• गुन्ह्यांची संख्या : 27
• जप्त वजन : 240 किलो 420 ग्रॅम
• एकूण किंमत : ₹29,76,46,540
कफ सिरप आणि गोळ्यांमुळे धोक्याची घंटा
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेल्या 1269 कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या आणि 12,730 अल्प्राझोलम गोळ्या, तसेच नयनगर हद्दीतून 5,752 ट्रॅमाडोल टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्या होत्या.
मध्यप्रदेशमधील विषारी सिरपचा धक्का अजूनही ताजा!
याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील धिंदवाडा येथे विषारी कफ सिरपमुळे 11 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक करण्यात आली असून, विषारी सिरपचे प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांचा संदेश स्पष्ट — अमली पदार्थांना शून्य सहनशीलता!
या कारवाईमुळे अमली पदार्थांचा साठा नष्ट करून पोलिसांनी समाजात स्पष्ट संदेश दिला आहे की, नशेचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.