उपस्थित सर्वांना माझा नमस्कार, हा विकासाचा उत्सव, देशाचा विकास होईल ही मोदींची गॅरंटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला संकल्प
मुंबई : देशाचा विकास होईल ही मोदींची गॅरंटी आहे, असा हुंकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा भरला. देशात वेगवेगळ्या प्रदेशात सर्वात मोठं-मोठे प्रकल्प आकार घेत आहेत.   पण यापूर्वी विकासाची नाही तर घोटाळ्याची चर्चा होत होती, असा घणाघात त्यांनी घातला.   ज्या ठिकाणी विरोधकांची गॅरंटी संपते, त्याठिकाणापासून मोदीची गॅरंटी सुरु होते. ज्यांना यापूर्वी कोणीच पुसले नाही. त्यांची खबरबात घेतली नाही. मोदी सरकार त्यांच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले. डबल इंजिन सरकार जनतेचा हात कधीच सोडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
देश बदलेगा भी बढेगा भी
शिवडी-न्हावा सागरी सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो असताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने आपण जनतेला हा सेतू पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावेळी कोणाला विश्वास वाटला नाही. त्यावेळी मी देश बदलेल पण आणि तो पुढे पण जाणार हे आश्वासन दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यानुसार हा 18000 कोटी रुपयांचा सागरी सेतू आज लोकांसाठी खूला करण्यात येत आहे.
काम लटकवण्याची पडली होती सवय
वांद्रे वरळी सी लिंक पूर्ण करण्यासाठी तेव्हाच्या सरकारला 10 वर्ष लागली होती. यावर बोट ठेवत त्यांनी यापूर्वीच्या विकास कामांना का उशीर होत होता याचे गुपीत उघडं केलं. त्यावेळी सर्वांनाच काम लटकवण्याची सवय होती, असा चिमटा त्यांनी आताच्या विरोधकांना काढला. अटल सेतू हा वांद्रे वरळी सी लिंकपेक्षा जास्त आधुनिक असल्याचे ते म्हणाले.
त्यांची नियत चांगली नव्हती
आज देशात अनेक नवीन योजना सुरु झाल्या आहेत. त्यांनी देशात आणि राज्यात सुरु असलेल्या विविध योजनांचा दाखला दिला. यापूर्वी अनेक वर्षांपासून देशावर ज्यांना राज्य केले. त्यांची नियत चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना देशाचा विकास करता आला नाही. आमची नियत साफ असल्याचे ते म्हणाले. आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांत भारत बदलला आहे. याची चर्चा होत आहे. यापूर्वी घोटाळ्यांची चर्चा होत असे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 2014 मध्ये मी रायगडावर गेलो होतो. त्यावेळी आपण काही संकल्प केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना पाहत असल्याचे ते म्हणाले.