दोन्ही उपमुख्यमंत्री व माथाडी कामगारांना नरेंद्र पाटीलांनी दिल रुग्णालयातून आभार संदेश

माथाडी नेते नरेंद्र पाटील अपघातग्रस्त MGM रुग्णालयात उपचार सुरू
नवी मुंबई :
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील हे किरकोळ अपघातग्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर काॅन्व्हाॅयमधील दुसऱ्या गाडीत बसत असताना चालकाने वाहन पुढे नेल्याने त्यांचा तोल गेला व ते खाली कोसळले. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून नवी मुंबईतील MGM रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
२५ सप्टेंबर रोजी मुंबई APMC येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व आमदार उपस्थित होते. राज्यातील पूरस्थितीमुळे दोन्ही उपमुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याने ते प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी त्या ठिकाणी सभास्थळीच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन व आदरांजली वाहिली.
आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त ज्यांनी अभिवादन केले त्या सर्वांना नरेंद्र पाटील यांनी रुग्णालयातूनच आभार मानले. त्यांनी विशेषत: दोन्ही उपमुख्यमंत्री व उपस्थित तमाम माथाडी कामगारांचे कृतज्ञतेने स्मरण केले.