Navi Mumbai Crime : राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या रुद्रा ट्रेडर्सचे संचालकाला एपीएमसी पोलिसांनी केला गजाआड
 
नवी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या   बांधावर   जावून शेतमाल खरेदी करुन नंतर त्यांना पैसे न देता त्यांना आपल्या   कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक   रकमेवर प्रति महीना ५ टक्के याप्रमाणे नफा देवू व मुळ गुंतवणूक केली रक्कम ११ महीन्यांनी परत मिळेल अशा गुंतवणूक स्किमचे आमिष दाखवून
तब्बल 300 शेतकरी,व्यापारी व गुंतवणुकदारकडून   जवळपास 25 ते 35 कोटी रुपयांनी   फसवणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी (Apmc Police)   रुद्रा ट्रेडर्स   कंपनीच्या (Rudra Treders ) दोन   संचालकसह अजून एकाला   अटक केली आहे. नितीन प्रकाश पार्टे ( ३४), दिपक सिताराम सुर्वे, (३३ )वर्षे,   सचिन अशोक भिसे ( ३९ ) आहेत .या भामट्यांने आता पर्यंत जवळपास ३०० शेतकरी व गुंतवणूकदारणा फसवणूक केली आहे .एपीएमसी पोलिसांनी आता या तिघांना अटक करुन अजून कित्ती लोकांची फसवणूक केली यांची तपास सुरू केली   आहे .
अशी केली फसवणूक...
वाशी एपीएमसी येथील सत्रा प्लाझा गाळा नंबर G-५२   मधे रुद्रा ट्रेडर्स ही कंपनी मसाल्याचा व ड्रायफ्रुटचा आयात निर्यातच्या कार्यालय   आहे . या कंपनीचे संचालक नितीन पार्टे व दीपक सुर्वे आहेत . या दोघंनी डोंबिवलीत राहणारे महेंद्र दगडू डेरे याना फसवणुक केल्याने ढेरे यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली . त्याचप्रमाणे पोलिसांनी तपास केल्याने राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांना फसवणूक केल्याने समजले .
शेतकरी यांचेकडून बांधावरच माल खरेदी करत असल्याने मोठया प्रमाणात नफा मिळत असून सदर कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक केले रकमेवर प्रति महीना ५ टक्के याप्रमाणे नफा देवू व मुळ गुंतवणूक केली रक्कम ११ महीन्यांनी परत मिळेल अशा गुंतवणूक स्किमचे आमिष दाखवून फिर्यादी व इतर ३०० गुंतवणूकदार यांचेकडून सुमारे २६ कोटी रुपये घेवून ते मुदत संपल्यानंतरही परत न करता गुंतवणूक केले लोकांना चेक देवून ते न वटविता फसवणूक केली आहे .तसेच लक्ष्मी प्रकाश को ऑप क्रेडीड सोसायटी या पतपेढीचे गुंतवणूक रकमेचा परतावा म्हणून खोटे व बनावट एफ डी बॉन्ड देवून फिर्यादी व इतर ३०० गुंतवणूकदार लोकांची अन्यायाने विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आली आहे .या फसवणुकामध्ये मोठा प्रमाणात शेतकरी आहेत त्यामुळे या भामट्यांवर विविध कलमाद्वारे ४२०,४०६,४०९, ४६५,४६७, ४६८,४७१,३४ सह प्राईज चिट्स अॅन्ड मनी सर्क्यूलेशन अॅक्ट १९७८ चे कलम ३,४,५ सह बॅनींग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्किम अॅक्ट सन २०१९ चे कलम २१,२२,२३,२४,२५ सह वित्तीय संस्थामधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३, च्या गुन्हा दाखल करण्यात आली आहे .
पोलीस उपायुक्त पंकज दहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त   एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी निरिक्षक सुधाकर ढाणे, सहा पोलिस निरीक्षक अशोक डमाळे,पोलीस उप निरीक्षक निलेश कुमार महाडीक यांचे पथक केले होते .
रुद्रा ट्रेडर्स या   कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी एपीएमसी   पोलीस निरीक्षक अजय शिंदे   यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभरात या कंपनीने आता पर्यंत ३०० हून अधिक शेतकरी व गुंतवणूकदारला   चुना लावला आहे. फसवणुकीचा आकडा ४० कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.