मुंबई APMC सचिवांच्या आदेशाला धान्य मार्केट अभियंत्यांनी दाखवली केराची टोपली

 
नवी मुंबई : मुंबई APMC सचिव पी .एल खंडागळे यांनी दोन महिन्यापूर्वी धान्य मार्केटचा पाहणी दौरा केला होता या पाहणी दौऱ्यात व्यापार भवन परिसरात   गार्डनच्या जागेवर विखरून पडलेले पत्रे   रिकामे करण्याचे आदेश सचिवांनी मार्केट अभियंत्यांना दिले होते, त्यावेळी मार्केट अभियंता पांडुरंग पिंगळे यांना ७ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता, मात्र दोन महीने होऊन सुद्धा तुटलेला पत्रा अजूनही जागेवरच आहे. त्यामुळे मार्केट अभियंता पिंगळे यांनी सचिवांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा सध्या बाजार आवारत सुरू आहे
मुंबई Apmc धान्य मार्केट मधील व्यापार भवनच्या आरक्षीत उद्यानाच्या जागेवर १ वर्षापूर्वी झाडे कापून अनधिकृतपणे पत्राचे शेड एका संस्थाने केला होता. या शेडवर महापालिकेतर्फे कारवाई देखील केली होती सदरच्या जागेवर एक वर्षापासून   तोडण्यात आलेल्या पत्रांचे   शेड त्याच ठिकाणी विखरून पडले आहेत.
तसेच या जागेवर पडलेला पत्रा सध्या फुटपाथवर पोहचला आहे. अशा परिस्थितीत   मोठी   दुर्घटना होऊ शकते. त्याच जागेवर बाहेरुन येणाऱ्या शेतमालाचे वाहतूकदार ,माथाडी कामगार जेवण करतात आणि   मधल्या वेळात निवांत बसतात, काही वेळासाठी विश्रांती देखील करतात अश्यावेळी कोणती जीवितहानी घडली तर याला जबाबदार कोण ? 
मार्केट अभियंताच्या नियोजन शून्य कारभारामुळे व्यापारी , वाहतूकदार , माथाडी कामगारांचा जीव देखील जाऊ शकतो.  
यावर माथाडी कामगार आणि वाहतूकदारांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली असून सदर पत्रे रिकामे करा अशी मागणी Apmc प्रशासनाकडे केली आहे मात्र मार्केट अभियंता कामगारांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत हा का? असा प्रश्न उपस्थित झालाय.