नाशिक मधून दीड लाख मॅट्रिक टन द्राक्ष साता समुद्रापार...
नाशिकच्या द्राक्षांना विदेशात चांगली मागणी...
नाशिक : यंदा दीड लाख मॅट्रिक टन द्राक्षांची विदेशात निर्यात करण्यात आली आहे... रशिया-युक्रेन युद्धामुळे समुद्रामार्गे द्राक्ष नेण्यासाठी कंटेनरचा १२ दिवस वाढलेला प्रवास व त्यामुळे कंटेनरची झालेली भाडेवाढ सोबतच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा बसलेला फटका यामुळे द्राक्ष निर्यात यंदा संकटात सापडली होती.... त्यामुळे हंगाम यंदा एक महिना अगोदरच संपत असला तरी द्राक्ष निर्यातीने यंदाचे आपले उद्दिष्ट साध्य केले आहे.... ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात विदेशात केली आहे... महत्त्वाचे म्हणजे अनेक संकटे अंगावर घेऊनही द्राक्ष उत्पादकांनी यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेने २२ हजार क्विंटल द्राक्ष अधिक प्रमाणात सातासमुद्रापार पाठवले आहेत नाशिकच्या द्राक्षांना यंदा विदेशात चांगली मागणी आली आहे....