कांदा 1 रुपये किलो;शेतकरी कंगाल ,शेतकरी प्रतिनिधी कांदा व्यापारी मालामाल
 
-किलोमागे शेतकऱ्यांना १९ रुपये आणि क्विंटलमागे १९०० रुपयांचा तोटा
-सरकारने जबाबदारी घेऊन कांदा उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी
एपीएमसी न्यूज डेस्क: मुंबई APMC सह इतर अनेक apmc मार्केट मधील होलसेल मार्केटमध्ये कांदा सध्या 20 ते 25 रु किलो दराने विकला जात आहे,   तर किरकोळ मार्केटमध्ये तोच कांदा 30 ते 35 रुपये किलोने विकला जातोय, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला निव्वळ 1 रुपयाचा भाव मिळतोय, ज्यामध्ये त्यांचा पेरणीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे राज्य सरकार म्हणत की हे सरकार शेतकऱ्यांच सरकार आहे, मात्र प्रत्यक्षात तसं दिसत नाहीये, मुंबई apmc मार्केटमध्ये राज्यातील 6 महसूल मधून 12 शेतकरी प्रतिनिधि येऊन स्वतःचा फायदा करून घेतात, मात्र शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यांचे लक्ष नसते.
राज्यातील काही बाजारात कांद्याचा भाव आता १०० रुपये क्विंटलपासून, म्हणजेच एक रुपया किलोपासून सुरु झाला. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २० रुपये किलोपर्यंत झाल्याचे शेतकरी सांगतात. म्हणजेच किलोमागे शेतकऱ्यांना १९ रुपये आणि क्विंटलमागे १९०० रुपयांचा तोटा होत आहे.
निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव किमान २ हजाराने पडले. आतापर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ६ लाख टन म्हणजेच ६० लाख क्विंटल कांद्याची विक्री केली. क्विंटलमागं २ हजारांचे नुकसान धरले तर किमान १२०० कोंटीचे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे.
निर्यातबंदी सरकारने केली होती. त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि कांदा उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सध्या कांदा उत्पादकांकडून जोर धरू लागली आहे.