‘आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरात राहतील’, नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
अयोध्या   : देशभरातील रामभक्तांसाठी सर्वात आनंदाचा क्षण आज अनुभवायला मिळतोय. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं आज लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पार पडतोय. प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीसे भावूक झालेले बघायला मिळाले. त्यांची देहबोली ही आज त्यांच्या प्रभू श्रीरामांप्रती असलेल्या भक्तीची ग्वाही देत होती. नरेंद्र मोदी यांनी आज 11 दिवसांचा उपवास सोडला. प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचं महत्त्व सांगितलं. राम मंदिर पुन्हा साकार होणं ही एक मोठी तपश्चर्याचा आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी एक खूप महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘गुलामीची मानसिकता तोडून राष्ट्र उभं राहिलं’, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपल्या युगानुयोगाच्या संयमाचा वारसा मिळाला आहे. आज आपल्याला रामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामीची मानसिकता तोडून राष्ट्र उभं राहिलं आहे. हे राष्ट्र नव इतिहासाचे सृजन करत आहे. आजच्या हजारो वर्षानंतरही लोक आजच्या या क्षणाची चर्चा करतील. ही किती मोठी रामकृपा आहे की आपण हा क्षण जगत आहोत. हा क्षण घटीत होताना पाहत आहोत. आज दिवस आणि दिशा आणि सर्व काही दिव्यतेने भारलेलं आहे. हा काळ सामान्य नाही. हा काळाच्या चक्रावर सर्वकालिक शाईने रेखाटणारी रेषा आहे. जिथे रामाचे काम होते, तिथे पवन पुत्र हनुमान तिथे आवश्य येतात. त्यामुळे मी राभक्त हनुमान आणि हनुमान गढीला प्रणाम करतो. सीता, लक्ष्मण, भरत आणि सर्वांना प्रणाम करतो. सरयूलाही प्रणाम करतो”, असं नरेंद्र मोदी अतिशय विनम्रतेने म्हणाले.
‘मी आज प्रभू श्रीरामांकडे क्षमा, याचनाही करतो…’
“मी यावेळी दैवी अनुभव घेत आहे. ज्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण झालं आहे, ते दिव्य आत्मा आपल्या आसपास आहेत. मी या दिव्य चेतनेलाही नमन करतो. मी आज प्रभू श्रीरामांकडे क्षमा, याचनाही करत आहे. आमच्या त्याग आणि तपश्येत काही तरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच इतकी शतके आपण हे काम पूर्ण करू शकलो नाही. आज ही उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आज आपल्याला आवश्य क्षमा करतील. देशवासियांनो, त्रेतात राम आगमनावर तुलसीदासने अत्यंत चांगला श्लोक म्हटला आहे”, अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.
मी भारताच्या न्यायपालिकेचे आभार मानतो’
“त्या कालखंडात तो वियोग १४ वर्षाचा होता. या युगात तर अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षाचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. भारताच्या संविधानात पहिल्याच प्रतीमध्ये भगवान राम विराजमान आहे. राम मंदिरासाठी कायदेशीर लढाई सुरू राहिली. मी भारताच्या न्यायपालिकेचे आभार मानतो. त्यांनी न्यायाची लाज राखली. न्यायाचे परिणाम म्हणून प्रभू रामाचे मंदिरही न्यायबद्ध पद्धतीने झाले. आज संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घराघरात रामज्योती प्रज्वलीत केली जाणार आहे”, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.