बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा,मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या!
 
गोंदियातील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आवाहन*
गोंदिया: एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र आलेले इंडिया आघाडीचे नेते यातून योग्य निवड करून देशाच्या विकासाची गंगा नव्या वेगाने वाहती राखण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदी बसवू या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी गोंदिया येथील जाहीर सभेत बोलताना केले. ज्यांचे अनेक नेते जेलमध्ये, आणि अनेकजण बेलवर आहेत, अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या आघाडीला कायमचे घरी बसवा, असेही ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा - गोंदिया चे उमेदवार सुनील मेंढे, गडचिरोली - चिमूरचे अशोक नेते यावेळी उपस्थित होते. लोकसभेची ही निवडणूक केवळ एका खासदारास विजयी करण्याची निवडणूक नसून दोन विचारधारांची लढाई आहे. विकासाची राजनीती, देशाच्या उज्जवल भविष्याचा संकल्प आणि देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देणे, मोदींना सत्तेवरून हटविणे आणि विकासाला विरोध करत भ्रष्टाचाराची पाठराखण करणे एवढाच घमंडी आघाडीचा अजेंडा आहे, असा स्पष्ट आरोप करीत नड्डा यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा तपशीलवार पाढाच या सभेत वाचला. मोदी सरकारने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून याआधी केवळ उच्चनीच, शहरी-ग्रामीण, आणि जातीधर्माच्या नावाने होणाऱ्या राजकारणास हद्दपार केले. मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली असून आता विकासाचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर व सबका साथ सबका विकास, सबका प्रयास या नीतीने देशाच्या राजनीतीला नवी दिशा मिळाली आहे. गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, दलि