राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज!
‘दुबार मतदारांचा डोंगर’ दाखवत मोठा गौप्यस्फोट**
मुंबई : “मतदार याद्या आधी स्वच्छ करा, मगच निवडणुका घ्या!” असा थेट इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगालाच खुलं आव्हान दिलं.
मुंबईत महाविकास आघाडी व मनसेच्या संयुक्त ‘सत्याचा मोर्चा’दरम्यान त्यांनी मतदार याद्यांतील घोळ उघड करत निवडणूक प्रक्रियेवरील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या मोर्चात उद्धव ठाकरे, शरद पवार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरेंचा पुराव्यांसह हल्ला
सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले,दुबार मतदार आहेत हे केवळ आम्हीच नाही, तर भाजप आणि अजित पवारांच्या गटातील लोकही सांगत आहेत. मग निवडणुकांची एवढी घाई का?”
यानंतर त्यांनी सभेमध्ये ‘दुबार मतदारांच्या याद्यांचा ढिगारा’ उघड केला. “हा पुरावा आहे,” असं सांगत ठाकरे यांनी शेकडो पानांचा दस्तऐवज दाखवत निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट बोट ठेवलं.
‘दुबार मतदार तिथेच फोडून काढा!’ठाकरे पुढे म्हणाले,
कल्याण-डोंबिवली-मुरबाड येथील साडेचार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केलं आहे. हे सगळं लपून-छपून सुरू आहे. लाखो लोकांचा वापर मतांसाठी केला गेला आहे.”ते पुढे म्हणाले,जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर लक्ष ठेवा. दुबार मतदार दिसले, तर तिथेच फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या.”
राज ठाकरेंचा ठाम संदेश पारदर्शक मतदार यादी झाल्यावरच कोणाचं यश आणि अपयश स्पष्ट होईल!”