APMC कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकास इव्हेंटबाजी अन् टक्केवारीमुळे रखडली; माथाडी नेता नरेंद्र पाटलांचा संचालक मंडळावर हल्लाबोल
 
-कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकास ‘टक्केवारी’ मुळे रखडले!
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी   बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या   विकासकामांचा वेग मंदावला असून 'टक्केवारी'मुळे कामे रखडली आहेत" अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे .
मागील २० वर्षा पासुन असलेल्या कांदा बटाटा मार्केटमधील पुनर्विकास तसेच अनेक महत्वाचे प्रकल्प अधिकारी, ठेकेदार, संचालक मंडळ   यांच्या टक्केवारीमुळे रखडल्याची तक्रार नेहमी आपल्या कानावर येते. याबाबत अनेकवेळा तक्रारी आल्यानंतरही या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येते, असे प्रतिक्रिया   माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे .
कांदा बटाटा मार्केट गेल्या २० वर्षा पासुन महापालिकाने अति धोकादायक घोषित केला आहे .तरी सुधा या मार्केटमधे व्यापार सुरु आहे .वेळोवेळी या मार्केटमधे स्लैब कोसळणे ,कामगारांच्या डोक्यावर पडण्याची घटना घडलेले आहे .या अति धोकादायक मार्केटला मागील २० वर्षापासून टेकू ,गटार लाइन नसताना साफसफाई काम ,रस्तेवर गरज नसताना डिवायडर,दरवर्षी रस्त्याचे डागडुजीचे निकृष्ट कामे करणे ,फुटपाथ निकृष्ट दर्जाचे तयार करुन   बाजार समीतिच्या तिजोरीवर करोडो रुपयांची   डल्ला मारण्याची कामे मार्केट उप अभियंताने या दरम्यान   केलेले आहे .यांच्या पाठिंबा सचिव ,मार्केट संचालक व सभापती यांनी दिल्याची माहिती सांगण्यात येत आहे .
या मार्केटमध्ये   पणन मंत्री सुभाष देशमुख ,बाळासाहेब पाटील ,अजितदादा पवार व १०० शिवसात मार्केटच्या पुनर्विकास मार्गी लावणारे सांगून जाणारे   आताचे पणनमंत्री अब्दुल सत्तार हे येवून सुधा अद्यप पुनर्विकासाचे नारळ फुटलेले नाही ,यांच्या कारण कार्यबाहू सभापती ,मार्केट संचालक व मार्केट उप अभियंता बोलले जात आहे .ज्या वेळी मंत्री मार्केटच्या पाहणी दौऱ्यात येतात त्यावेळी त्या मंत्र्याना मार्केट फिरवतात नंतर मार्केटच्या पुनर्विकासाचा नवीन तयार केलेल्या व्हिडिओ दाखवला जातो आणि त्या मंत्र्याना लॉलीपॉप दिला जातो .असे पुनर्विकासाच्या खेळ सुरू आहे .
कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाठी मंत्री ,बिल्डर ,अर्किटेक ,संचालक ,सभापती ,सचिव ,उप अभियंताने नागपूर पासून मुंबई पर्यंत कित्येक बैठक झालं ,मात्र आता पर्यंत पुनर्वंधणीचा नारळ फुटला नाही ,त्यामुळे या टक्केवारी अभियंताला हकालपट्टी करा तर मार्केटच्या पुनर्विकास होणार असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .