राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची मार्च 2024 पासून अंमलबावणी केली जाणार आहे. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठक
राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली
गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ
ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पाला 7 हजार 15 कोटींची मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा.
सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज. परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत.  
ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ.
ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी निधी उभारणार.
बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ.
मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबवणार.
कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ.
चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल.