वाढता पारा, रमजान मुळे केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.
 
एका दिवसात १०० टन कलिंगडाची विक्री
-रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला
नवी मुंबई :   एकीकडे रखरखते ऊन... अन् दुसरीकडे रमजानचे रोजे. दिवसभर उपासीपोटी दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी मुस्लीम बांधव फळांचा आस्वाद घेऊन रोजे सोडतात. सध्या पवित्र रमजान महिन्यात पाणीदार फळांना विशेष मागणी आहे. त्यामुळे मुंबई APMC घाऊक फलबाजारात कलिंगड, पपई, खरबूज, संत्रा, मोसंबी आदी फळांना मागणी वाढली आहे. तसेच मागणीच्या तुलनेत माल कमी प्रमाणात बाजारात दाखल होत असल्याने फळांच्या भावात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपूर्ण रमजान महिन्यात फळांचे   भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यपाऱ्याकडून बोलले जात आहे . मात्र या तेजीत शेतकऱ्यांना फायदा होणार या दलालांना ? अशी प्रश्न बाजार घटकांकडून होत आहे .
रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली आहे . यंदाही रमजानच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी व्यपाऱ्याने   विविध फळांच्या उपलब्धतेसाठी परप्रांतातून अन् विदेशातून मोठ्या प्रमाणावर धावपळ केली आहे .
सध्या फळमार्केट्मधे कलिंगडाची मागणी जास्त वाढली असून दिवसात   ८० ते १०० गाड्याची आवक होऊ लागली आहे ,फळ मार्केटमध्ये गुरुवारी ११० गाड्यातून   ९००० क्विंटल   कलिंगडाची आवक झाली आहे . मालाच्या उठाव असल्याने १५ ते १८ रुपये किलोने विक्री होत आहे . सोलापूर,नगर ,जळगाव ,मद्रास ,छत्तीसगड या भागातून कलिगडची आवक होत आहे . येणाऱ्या काळात आवक वाढणार असल्याची माहिती कलिंगड व्यापारी शंकर चौरासिया यांनी एपीएमसी न्यूजला दिली आहे .
फळ मार्केटमध्ये आज जवळपास ५०० गाड्याची आवक झाली असून यामध्ये १०० ते १५० गाड्याची आवक हापूस आंबाच्या आहेत ,बाजारात सध्या 4 ते ६ डजनच्या आंब्याच्या पेटीचा भाव २००० ते ५००० पर्यंत मिळत आहे . तर केरळ ,कर्नाटक आंबाच्या भाव प्रति कॅरेट २००० ते ३००० रुपये विक्री होत आहे .  
घाऊक मार्केटमध्ये   फळांचे दर अननस प्रति किलो   ४० ते ५० , मोसंबी प्रति किलो ३० ते ४० , संत्रा प्रति किलो ३५ ते ४५ , डाळिंब प्रति किलोस ८०-१२०, कलिंगड किलोस १३-१८, खरबुज २२-२५, पपई १०-२२, चिक्कू ३५-४०, पेरू प्रति २० ते ४५ किलो ,ड्रॅगनफ्रूट १०० ते १२० ,रामफळ ८० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे .