घसणाऱ्या जीभेमुळे वादात असणारे सत्तार, पाहा किती वेळा आणि कोणाला काय म्हणालेत..
 
Abdul Sattar : अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना राज्याच्या काही भागात ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही भागातून ओल्या दुष्काळाची मागणी सुरु होती. म्हणून मंत्री महोदय तेव्हा बीड दौऱ्यावर गेले. तेव्हा देखील त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांनाच दारु पिता का? असा थेट सवाल केला होता. तेव्हा ते चांगलेच वादात सापडले. मग त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मिडीयावरुन सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला.
महायुतीमधील माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार सातत्याने त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिलेत. सत्तार यांनी आता एका कार्यक्रमातून शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून आणि सामान्य नागरिकांनाकडून टीकेची झोड उठली आहे. शिवीगाळ करण्याचं निमित्त होतं ते गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे. तर झालं असं की नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थातच १ जानेवारीला अब्दुल सत्तार यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने सिल्लोड शहरात गौतमी पाटीलच्या डान्स आणि लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे कार्यक्रमाला गौतमीचे चाहते आणि सत्तार यांचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रचंड गर्दी झाली. तर आपल्याला पहिल्यापासूनच माहित आहे की गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की हुल्लडबाजी गोंधळ होतोच. आणि सत्तार यांच्या कार्यक्रमात देखील असंच झालं.
सत्तार यांच्या कार्यक्रमात देखील गोंधळ झाला. मग मंत्री महोदय भडकले. आणि थेट स्टेजवरुन उपस्थितांना शिवीगाळ केली. तसंच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे देखील मंत्री महोदय यांनी आदेश दिले. सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे एवढंही म्हटलं की बघताय काय त्यांना एवढं हाना की त्यांची हाडे तुटली पाहिजेत. त्यांच्या गांXX फटके टाका. माणसांची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम बघा. तसंच आणखी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भाषा वापरली. यामुळे आता त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. तसंच विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे.
तर चला याआधी सत्तार यांनी कोण कोणती वादग्रस्त वक्तव्य केलेत ते पाहू.
जिल्हाधिकाऱ्यांना थेट दारु पिता का? असा प्रश्न
अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना राज्याच्या काही भागात ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही भागातून ओल्या दुष्काळाची मागणी सुरु होती. म्हणून मंत्री महोदय तेव्हा बीड दौऱ्यावर गेले. तेव्हा देखील त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांनाच दारु पिता का? असा थेट सवाल केला होता. तेव्हा ते चांगलेच वादात सापडले. मग त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मिडीयावरुन सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द
एक वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित प्रतिनिधीने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवरुन सत्तार यांना प्रश्न विचार होता. तेव्हा देखील त्यांची जीभ चांगलीच घसरली होती. तेव्हा मंत्री महोदय म्हणाले "सुप्रिया सुळे इतकी भिकार**झाली असेल, तर सुप्रिया सुळे यांना देखील खोके देऊ". सत्तार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. एवढंच झालं नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला भरदिवसा लाथ मारली
२०१० साली छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा किरकोळ कारणावरुन सत्तार आणि एका काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. तेव्हा थेट या मंत्री महोदय यांनी कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सत्तार यांनी यापूर्वी देखील वारंवार अनेक मंत्र्यांबाबत आणि राजकीय नेते यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. २०१९ साली पैठणच्या दौऱ्यावर असताना सत्तार यांनी हरिभाऊ बागडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेव्हा देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. तसंच बागडे यांचे वय पाहून तरी त्यांच्यावर टीका करायला हवी होती, अशा शब्दांत काही जणांनी त्यांना सुनावले होते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलतानाही सत्तार यांची ८ मे २०२३ रोजी जीभ घसरली होती. यावेळी सत्तार म्हणाले की, आमच्या मतांवर राज्यसभेत निवडून गेलेला हा महाकुत्रा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. मग तेव्हा देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक दिवसांपासून सत्तार वादग्रस्त वक्तव्य करत आलेत. पण अजूनही त्यांची बोलताना जीभ घसरतच आहे.
वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याच्या आदेश काढण्याच्या मुद्यावरून ते अडचणीत सापडले आहेत. तसंच सिल्लोड महोत्सवाच्या आयोजनासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावल्याचा आणि कृषी खात्याच्या यंत्रणेला १५ कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचे वृत्तही याआधी समोर आले आहे. त्यामुळे देखील ते अडचणीत सापडलेत.
दरम्यान, सत्तार यांच्या जन्मदिवस निमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते जे बोलले त्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी वापरलेल्या शब्दाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो असं देखील सत्तार म्हटलेत.