श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात वाढदिवसाचा दिखावा!
-मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या व्यपाऱ्यामध्ये नाराजगी
-मार्केटमधे अवैधपणे बॅनर लावून केलं जातं विकृतीकरण
-मुंबई Apmc मुख्यालयासमोरच अनधिकृत होर्डिंग
 
नवी मुंबई : मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमधे प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठ कार्यक्रमासाठी सर्व बाजार घटकांनी मिळून आयोजन केलं होतं, मात्र मार्केट संचालकांनी या प्राण प्रतिषठेच्या कार्यक्रमात श्रीरामांचे बॅनर कमी आणि आपलेच बॅनर संपूर्ण मार्केटमधे लावून बाजार घटकांचा विश्वासघात केल्याची माहिती काही व्यापाऱ्यानी दिली आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामपेक्षा भाजीपाला मार्केट संचालक   मोठा आहेत का? अशी चर्चा बाजार आवारात होऊ लागली आहे .
मार्केटच्या आवक व जावक गेट पासूनच श्रीरामाचे बॅनर कमी आणि वाढ दिवसाच्या शुभेच्छा लावलेले बॅनर तुम्हाला दिसतील. तुमची नजर जिथे जाईल, तिथ पर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लावले आहेतं, इतकेच नाही तर श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जो मंडप बांधण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा श्रीरामाचा फोटो लहान व वाढ दिवसाचा बॅनर मोठा होता. त्यामुळे बाजार घटक सांगतात, की सदर कार्यक्रम श्री रामाची होता की, संचालकांच्या वाढदिवसाचा?
सध्या Apmcत अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. यामुळे मुंबई Apmc प्रशासनाचा   लाखो रुपयांचा महसूल बुडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई Apmc तील पाचही मार्केट व बाजार समितीच्या मुख्यालयासमोर चौकातही संचालक व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवसाचे जाहिरात फलक लागलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे   एपीएमसी मार्केटमध्ये विविध वाणिज्य पतसंस्था कार्यालय आहेत. या पतसंस्थांच्या सभा, अध्यक्ष यांची निवड तसेच वाढदिवस यासाठी शुभेच्छा देणारे अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे लावलेले दिसतात . काही लोक एका दिवसाची परवानगी घेऊन १० दिवस होर्डिंग लावतात .   काही संचालक   कोणतीही परवानगी न घेता बॅनर मार्केटमध्ये लावतात, ज्यामुळे संपूर्ण मार्केट विकृतीकरण झालेलं दिसतं. राजकीय व संचालक मंडळाच्या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचे पाहून नोकऱ्या विषयीचे जाहिरातीचे पोस्टर, वाणिज्य आस्थापना हे त्यांच्या उत्पादनाची जाहिरातबाजी करताना दिसतात.   विशेष म्हणजे Apmc प्रशासनाच्या नाकावर टिचून हे होर्डिंग दिमाखात झळकत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या Apmc प्रवेश द्वारावर सचिवांचे याकडे दुर्लक्ष्य होताना दिसत आहे.